Sunday, June 10, 2012

भुसावळ विभागात सरासरी पाऊस घट्नार.


यावर्षी मान्सून चांगला आहे असे असले तरी भुसावळ विभागात चांगला पाऊस हा थोड्या उशिरानेच म्हणजेच जुनाच्या ३-४ हपत्यात हजेरी  लावण्याची शक्यता आहे. वेलनेस चे हवामान व पर्यावरण अभ्यासक निलेश गोरे आणि अतुल धांडे यांनी सांगितले की ढगांचा जमाव खूप प्रमाणात दिसून येईल पण त्याप्रमाणात पऊस पडण्याची शक्यता मात्र कमी आहे व याची अनुभूती आपल्याला नुकत्याच झालेल्या पाऊसात आली आहे कारण पाऊस पडण्यासाठी योग्य आर्द्रतेची आणि त्यापासून निर्माण झालेल्या थंडावयाची गरज असते आणि नेमकी हीच महत्वाची बाब  दोन वर्षातील भरमसाठ वृक्ष तोडीमुळे, विद्युत निर्मिती मुळे वाढलेल्या तापमानामुळे व मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जाळल्यामुळे प्रभावित झाली आहे व त्यामुळे भरपूर प्रमाणात ढग जमल्यावरही पडणार्‍या पावसाची सरासरी घटन्याचि शक्यता आहे व पुढील काही वर्षात सुधार न झाल्यास परिस्थिती चिंताजनक बनू शकते कारण भुसावळ विभागीतील आर्दत्तेत २ ते ३ टक्के घट झाली आहे असे आढळून आले.

आपल्याला एक भाग लक्षात ठेवावा लागेल तो म्हणजे पावसाळ्यात जमलेल्या ढगांपैकी फक्त २२% ढगांचा उपयोग पाऊस पडण्यासाठी होतो बाकी ७८% ढग हे पाऊस न पाडता गडगडात करून निघून जातात, या २२ टक्क्यांमधे आधीच घाट झाली आहे त्यामुळे पाऊस ठीक झाला तरीही तो गरजेनुसार अपूर्ण ठरणार आहे त्यात चिंता वाढवणारी बाब म्हणजे भूजल पातळी दरवर्षी १ ते 2 फुट खाली जात आहे.

आज वेळ आहे ती नॅनो क्रांती ची म्हणजेच करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणाविषयी करत्यवनिष्ठ व वचनबद्ध होण्याची.  निसर्गाची साइकल सुव्यवस्थित चालण्यासाठी वृक्षारोपण करणे, प्रदूषण नियंत्रित करणे, पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे, प्लास्टिक न जाळने, प्लास्टिक कचर्याचे नियोजन करणे, ई. बाबी जर यशस्वीरित्या पार पडल्या तर भुसावळ विभागातील हवामाणात कमालीची सुधारणा होऊ शकते. भविश्यकाळ आजही आपल्याच हातात आहे तो व तो कसा असावा ही आपली निवड.



निलेश गोरे,
संस्थापक,
वेलनेस फाउंडेशन – भुसावळ, 9922851678