Sunday, June 10, 2012

भुसावळ विभागात सरासरी पाऊस घट्नार.


यावर्षी मान्सून चांगला आहे असे असले तरी भुसावळ विभागात चांगला पाऊस हा थोड्या उशिरानेच म्हणजेच जुनाच्या ३-४ हपत्यात हजेरी  लावण्याची शक्यता आहे. वेलनेस चे हवामान व पर्यावरण अभ्यासक निलेश गोरे आणि अतुल धांडे यांनी सांगितले की ढगांचा जमाव खूप प्रमाणात दिसून येईल पण त्याप्रमाणात पऊस पडण्याची शक्यता मात्र कमी आहे व याची अनुभूती आपल्याला नुकत्याच झालेल्या पाऊसात आली आहे कारण पाऊस पडण्यासाठी योग्य आर्द्रतेची आणि त्यापासून निर्माण झालेल्या थंडावयाची गरज असते आणि नेमकी हीच महत्वाची बाब  दोन वर्षातील भरमसाठ वृक्ष तोडीमुळे, विद्युत निर्मिती मुळे वाढलेल्या तापमानामुळे व मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जाळल्यामुळे प्रभावित झाली आहे व त्यामुळे भरपूर प्रमाणात ढग जमल्यावरही पडणार्‍या पावसाची सरासरी घटन्याचि शक्यता आहे व पुढील काही वर्षात सुधार न झाल्यास परिस्थिती चिंताजनक बनू शकते कारण भुसावळ विभागीतील आर्दत्तेत २ ते ३ टक्के घट झाली आहे असे आढळून आले.

आपल्याला एक भाग लक्षात ठेवावा लागेल तो म्हणजे पावसाळ्यात जमलेल्या ढगांपैकी फक्त २२% ढगांचा उपयोग पाऊस पडण्यासाठी होतो बाकी ७८% ढग हे पाऊस न पाडता गडगडात करून निघून जातात, या २२ टक्क्यांमधे आधीच घाट झाली आहे त्यामुळे पाऊस ठीक झाला तरीही तो गरजेनुसार अपूर्ण ठरणार आहे त्यात चिंता वाढवणारी बाब म्हणजे भूजल पातळी दरवर्षी १ ते 2 फुट खाली जात आहे.

आज वेळ आहे ती नॅनो क्रांती ची म्हणजेच करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणाविषयी करत्यवनिष्ठ व वचनबद्ध होण्याची.  निसर्गाची साइकल सुव्यवस्थित चालण्यासाठी वृक्षारोपण करणे, प्रदूषण नियंत्रित करणे, पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे, प्लास्टिक न जाळने, प्लास्टिक कचर्याचे नियोजन करणे, ई. बाबी जर यशस्वीरित्या पार पडल्या तर भुसावळ विभागातील हवामाणात कमालीची सुधारणा होऊ शकते. भविश्यकाळ आजही आपल्याच हातात आहे तो व तो कसा असावा ही आपली निवड.



निलेश गोरे,
संस्थापक,
वेलनेस फाउंडेशन – भुसावळ, 9922851678

Friday, April 6, 2012

व्हिटामिन मध्ये दडलय मुलांचे करिअर आणि यश


“व्हिटामिन मध्ये दडलय मुलांचे करिअर आणि यश”

होय, व्हिटामिन मध्ये दडलय मुलांचे करिअर आणि यश आणि ते हि एका विशिष्ट व्हिटामिन मध्ये आणि ते म्हणजे व्हिटामिन "डी". बरेच पालक जेंव्हा मुलां मध्ये असलेला आळस, निरस आणि हिरमुसलेपणा अशा एक सारख्या समस्या घेवून समोर आले तेंव्हा एक भाग लक्षात आला तो म्हणजे समस्या हि मानसिक नसून ती शारेरिक आहे व त्यामुळे मुलांचे करिअर प्रभावित होत आहे म्हणूनच वेलनेस फाउंडेशन - भुसावळ अंतर्गेत मनोवैज्ञानिक काउंसलर निलेश गोरे व यांच्या टीम ने जानेवारी ते मार्च दरम्यान पालकांसोबत १० ते २३ वायोगातील समस्या असलेल्या जवळपास ५० मुलांचे सर्वेक्षण व अध्ययन केले व त्यामागील कारणे शोधून काढले.

काय आढळून आले ?

आम्हाला असे आढळून आले कि काही विशिष्ट स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आणि बदललेल्या लाईफ स्टाइल मुळे मुलांना व्हिटामिन "डी" चा खुराक योग्य प्रमाणात मिळत नाही. व्हिटामिन "डी" च्या अभावामुळे अभ्यासात मन न लागणे, मानसिक आळस (मेंटल लेथार्जी) निर्माण होते ज्यामुळे बुद्धिमत्ता, क्षमता व कौशल्यांवर परिणाम होते व त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही. व्हिटामिन "डी" च्या अभावामुळे हाडे देखील कमकुवत होतात तसेच मानसिक व शारेरिक कमजोरी वाढते व मन खचत जाते.

त्यामागील मुख्य कारण काय?

वेल्नेसच्या सर्वेक्षणात असे लक्षात आले कि बरेच पालक मुलांना ओवर प्रोटेक्ट करत असल्याने त्यांना थंडीत - थंडीमुळे आणि उन्हाळ्यात उन्हामुळे घराबाहेर निघण्यास आडकाठी करतात. तसेच बदललेल्या लाईफ स्टाइल मुळे मैदानी खेळांकडे निरस आणि सोशल नेट्वर्किंग मुळे वाढलेला घरोबा आणि कवळ्या वयात जीन्स चा वाढलेला अतिरेक या बाबींमुळे व्हिटामिन "डी" चा अभाव होत आहे जो शारेरिक व करिअर साठी धोकादायक आहे तसेच मुलींना / स्त्रियांना व्हिटामिन "डी" चा अभाव हा सर्व बाजूंनी पुरुषांपेक्षाही जास्त धोकादायक आहे.

काय करावे? काय खबरदारी घ्यावी

१) व्हिटामिन "डी" हे फक्त कवळ्या सुर्यप्रकाशातूनच मिळतो म्हणून सकाळच्या उन्हाचा लाभ घ्यावा.

२) करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांनी नेहमी कवळे उन घ्यावे त्यामुळे तरतरी मिळते, तणाव दूर होतो, एकाग्रता व कार्यक्षमता वाढते.

३) व्हिटामिन "डी" मुळे त्वचा स्वच्छ आणि उजळ राहते. केसांनाही पोषण मिळते

४) जीन्स चा विशेषतः स्कीन टाईट चा अतिरेक टाळावा.

५) व्हिटामिन "डी" हे उन्हात असले तरीही दुपार नंतर मिळत नाही.

६) वय १४ पर्यंत मुलांनी हाफ प्यांट किंवा थ्री फोर्थ ला आणि मुलींनी फ्रॉकला प्राधान्य द्यावे

७) पुरुषांपेक्षा स्त्रियांना "डी" च्या अभावामुळे जास्त त्रास होतो म्हणून टाळाटाळ करू नये

८) निसर्गात वावरणारे निरोगी राहतात म्हणून स्वतः आणि मुलांना सुद्धा सकाळी वेळ काढावा

कुठेही जा पळसाला पाने तीनच त्याच प्रमाणे समोर आलेल्या समस्या, त्यामागील कारणे व त्यावरील उपाय हे फक्त जळगाव - भुसावळ नसून सार्वत्रिक आहे.

वेलनेस फाउंडेशन तर्फे आम्ही मुलांसाठी एकच आवाहन करतो कि निसर्गासोबत असाल तर निरोगी राहाल, कवळे उन खाल तर करिअर मध्ये चांगले चमकाल. प्रौढांना आम्ही एकाच सांगू इच्छितो कि आपले शरीर हा निसर्गाचा एक अदभुतरम्य असा अविष्कार आहे व त्यात तक्रार निर्माण होवू नये म्हणून व चालीशी नंतर हाडा-सांध्यांचे व मेंदूचे प्रोब्लेम्स वाढू नये म्हणून भरपूर कवळे उन खा.

म्हणूनच आम्ही म्हणतो व्हिटामिन मध्ये दडलय मुलांचे करिअर आणि यश. करिअरवर तसेच इतर विषयांवर वेलनेस फाउंडेशन - भुसावळ चे सर्वेक्षण व अध्ययन चालू आहे. जळगाव -भुसावळतील मुलांना यशस्वी बनवणे व समस्या निर्मुलन करणे हाच आमचा मानस. संस्थापक व मनोवैज्ञानिक काउंसलर निलेश गोरे - वेलनेस फाउंडेशन.

Nilesh Gore,

Founder President : Wellness Foundation - Bhusawal

Sunday, December 25, 2011

वेलनेस फाउंडेशन तर्फे होमिओपॅथीक चिकित्सा शिबीर


होमिओपॅथीच्या माध्यमातून अनेक जुनाट असाध्य रोगांना योग्य उपचार करून दुरुस्त केले जाऊ शकतात म्हणूनच रविवार दि २५ रोजी वेलनेस फाउंडेशन तर्फे मोफत होमिओपॅथीक चिकित्सा शिबीराचे आयोजन नवशक्ती आर्केड समोर, त्रिमूर्ती झेरॉक्सच्यावर, जामनेर रोड येथे सकाळी ८:३० ते दु. या वेळेत केले आहे. नाशिकचे सुप्रसिद्ध डॉ. अल्पेश पाटील हे चिकित्सा आणि मार्गदर्शन करणार आहेत तसेच मनोवैज्ञानिक काउंसलर व सायकोअॅनालिस्ट निलेश गोरे हे मनोविकारांची चिकित्सा करणार आहेत. या शिबिरात विशेषत: त्वचा रोग, मुत्र खडा, दमा, अर्धशिशी, संधीवात, फायलेरिया, स्त्रियांच्या गर्भाशयाच्या व मासिक पाळीचे विकार, टॉन्सिल, मणक्यांचे आजार व इत्यादी आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे. आयोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन वेलनेस फाउंडेशन भुसावळने केले आहे.