
“व्हिटामिन मध्ये दडलय मुलांचे करिअर आणि यश”
होय, व्हिटामिन मध्ये दडलय मुलांचे करिअर आणि यश आणि ते हि एका विशिष्ट व्हिटामिन मध्ये आणि ते म्हणजे व्हिटामिन "डी". बरेच पालक जेंव्हा मुलां मध्ये असलेला आळस, निरस आणि हिरमुसलेपणा अशा एक सारख्या समस्या घेवून समोर आले तेंव्हा एक भाग लक्षात आला तो म्हणजे समस्या हि मानसिक नसून ती शारेरिक आहे व त्यामुळे मुलांचे करिअर प्रभावित होत आहे म्हणूनच वेलनेस फाउंडेशन - भुसावळ अंतर्गेत मनोवैज्ञानिक काउंसलर निलेश गोरे व यांच्या टीम ने जानेवारी ते मार्च दरम्यान पालकांसोबत १० ते २३ वायोगातील समस्या असलेल्या जवळपास ५० मुलांचे सर्वेक्षण व अध्ययन केले व त्यामागील कारणे शोधून काढले.
काय आढळून आले ?
आम्हाला असे आढळून आले कि काही विशिष्ट स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आणि बदललेल्या लाईफ स्टाइल मुळे मुलांना व्हिटामिन "डी" चा खुराक योग्य प्रमाणात मिळत नाही. व्हिटामिन "डी" च्या अभावामुळे अभ्यासात मन न लागणे, मानसिक आळस (मेंटल लेथार्जी) निर्माण होते ज्यामुळे बुद्धिमत्ता, क्षमता व कौशल्यांवर परिणाम होते व त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही. व्हिटामिन "डी" च्या अभावामुळे हाडे देखील कमकुवत होतात तसेच मानसिक व शारेरिक कमजोरी वाढते व मन खचत जाते.
त्यामागील मुख्य कारण काय?
वेल्नेसच्या सर्वेक्षणात असे लक्षात आले कि बरेच पालक मुलांना ओवर प्रोटेक्ट करत असल्याने त्यांना थंडीत - थंडीमुळे आणि उन्हाळ्यात उन्हामुळे घराबाहेर निघण्यास आडकाठी करतात. तसेच बदललेल्या लाईफ स्टाइल मुळे मैदानी खेळांकडे निरस आणि सोशल नेट्वर्किंग मुळे वाढलेला घरोबा आणि कवळ्या वयात जीन्स चा वाढलेला अतिरेक या बाबींमुळे व्हिटामिन "डी" चा अभाव होत आहे जो शारेरिक व करिअर साठी धोकादायक आहे तसेच मुलींना / स्त्रियांना व्हिटामिन "डी" चा अभाव हा सर्व बाजूंनी पुरुषांपेक्षाही जास्त धोकादायक आहे.
काय करावे? काय खबरदारी घ्यावी
१) व्हिटामिन "डी" हे फक्त कवळ्या सुर्यप्रकाशातूनच मिळतो म्हणून सकाळच्या उन्हाचा लाभ घ्यावा.
२) करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांनी नेहमी कवळे उन घ्यावे त्यामुळे तरतरी मिळते, तणाव दूर होतो, एकाग्रता व कार्यक्षमता वाढते.
३) व्हिटामिन "डी" मुळे त्वचा स्वच्छ आणि उजळ राहते. केसांनाही पोषण मिळते
४) जीन्स चा विशेषतः स्कीन टाईट चा अतिरेक टाळावा.
५) व्हिटामिन "डी" हे उन्हात असले तरीही दुपार नंतर मिळत नाही.
६) वय १४ पर्यंत मुलांनी हाफ प्यांट किंवा थ्री फोर्थ ला आणि मुलींनी फ्रॉकला प्राधान्य द्यावे
७) पुरुषांपेक्षा स्त्रियांना "डी" च्या अभावामुळे जास्त त्रास होतो म्हणून टाळाटाळ करू नये
८) निसर्गात वावरणारे निरोगी राहतात म्हणून स्वतः आणि मुलांना सुद्धा सकाळी वेळ काढावा
कुठेही जा पळसाला पाने तीनच त्याच प्रमाणे समोर आलेल्या समस्या, त्यामागील कारणे व त्यावरील उपाय हे फक्त जळगाव - भुसावळ नसून सार्वत्रिक आहे.
वेलनेस फाउंडेशन तर्फे आम्ही मुलांसाठी एकच आवाहन करतो कि निसर्गासोबत असाल तर निरोगी राहाल, कवळे उन खाल तर करिअर मध्ये चांगले चमकाल. प्रौढांना आम्ही एकाच सांगू इच्छितो कि आपले शरीर हा निसर्गाचा एक अदभुतरम्य असा अविष्कार आहे व त्यात तक्रार निर्माण होवू नये म्हणून व चालीशी नंतर हाडा-सांध्यांचे व मेंदूचे प्रोब्लेम्स वाढू नये म्हणून भरपूर कवळे उन खा.
म्हणूनच आम्ही म्हणतो व्हिटामिन मध्ये दडलय मुलांचे करिअर आणि यश. करिअरवर तसेच इतर विषयांवर वेलनेस फाउंडेशन - भुसावळ चे सर्वेक्षण व अध्ययन चालू आहे. जळगाव -भुसावळतील मुलांना यशस्वी बनवणे व समस्या निर्मुलन करणे हाच आमचा मानस. संस्थापक व मनोवैज्ञानिक काउंसलर निलेश गोरे - वेलनेस फाउंडेशन.
Nilesh Gore,
Founder President : Wellness Foundation - Bhusawal